📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र

कराडमध्ये १० सप्टेंबरला जनता दरबार; प्रलंबित शासकीय कामांसाठी नागरिकांना निवेदन सादर करण्याचे आवाहन

👤 Kiran Nazirkar    📍 कराड    🗓 02 Sep 2026 11:42 PM    👁 74 Views    ⏱️ 4 मिनिटे वाचन
कराडमध्ये १० सप्टेंबरला जनता दरबार; प्रलंबित शासकीय कामांसाठी नागरिकांना निवेदन सादर करण्याचे आवाहन

📷 फोटो गॅलरी

कराड | प्रतिनिधी : नागरिकांच्या शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या वैयक्तिक कामांना गती मिळावी आणि विविध अडचणी व प्रश्न संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देता यावेत, यासाठी कराड येथे १० सप्टेंबर २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संतोष साखरे यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार कराड येथील शासकीय विश्रामगृहात होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांना आपल्या प्रलंबित शासकीय कामांबाबत निवेदने सादर करता येणार आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये विविध कारणांमुळे प्रलंबित असलेली वैयक्तिक कामे, नागरिकांच्या अडचणी तसेच विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न या जनता दरबाराच्या माध्यमातून मांडता येणार आहेत. संबंधित विभागांचे लक्ष या प्रश्नांकडे वेधून त्यावर आवश्यक कार्यवाही व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

ज्या नागरिकांची शासकीय स्तरावरील वैयक्तिक कामे प्रलंबित आहेत, त्यांनी आपल्या प्रकरणाची सविस्तर माहिती देणारे निवेदन तयार करून आणावे. हे निवेदन रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या नावे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवेदनासोबत संबंधित प्रकरणाची आवश्यक कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे आणल्यास प्रश्न संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे प्रलंबित कामे असलेल्या नागरिकांनी आपल्या समस्येची संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह जनता दरबाराला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जनता दरबाराची माहिती
📅 दिनांक : १० सप्टेंबर २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते दुपारी २
📍 स्थळ : शासकीय विश्रामगृह, कराड

प्रलंबित शासकीय कामांबाबत नागरिकांनी निवेदन सादर करून या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या