राजकीय
मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा
📷 फोटो गॅलरी
फलटण (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विंचूर्णी (ता. फलटण) येथे माजी खासदार रणजितसिंह (रणजितदादा) नाईक निंबाळकर यांच्या वैयक्तिक निवासस्थानी व फार्महाऊसवर अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरचा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना, त्यांनी आपल्या अतिशय व्यस्त नियोजनातून विशेष वेळ काढत विंचूर्णी येथील फार्महाऊसला भेट दिली. रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्यावरील विशेष प्रेम, आपुलकी आणि स्नेहापोटी मुख्यमंत्र्यांनी या भेटीसाठी आवर्जून वेळ दिला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औक्षण व स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
केक कापल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्यात अत्यंत निवांत वातावरणात चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी फलटण तालुक्यातील चालू असलेली विविध विकासकामे, जलसिंचन प्रकल्प आणि स्थानिक प्रश्नांची आस्थेने माहिती घेऊन सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली ही आपुलकी आणि दिलेला वेळ पाहता, देवेंद्र फडणवीस यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम व विश्वास असल्याचे पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात अव्वल स्थान असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे वेळ काढून दिलेली भेट रणजितदादा नाईक निंबाळकर यांचे पक्षश्रेष्ठींमधील आणि राज्य पातळीवरील मजबूत राजकीय स्थान अधोरेखित करते.
या सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर,सौ.मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह नाईक निंबाळकर कुटुंबीय, आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांना निरोगी व दीर्घायुषी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या.
राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असणारा हा सहजसुंदर योग पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्यातील घट्ट राजकीय बांधिलकी, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही भेट आगामी काळात फलटण तालुक्याच्या राजकारणात आणि विकासात अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, या दोघांमधील दृढ राजकीय संबंधांचीच फलटणसह राज्यभर चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,084)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (270)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (183)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)