📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
राजकीय

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

👤 फलटण प्रतिनिधी    📍 फलटण    🗓 21 Jul 2026 11:04 PM    👁 56 Views    ⏱️ 2 मिनिटे वाचन

📷 फोटो गॅलरी

फलटण, दि. २२ जुलै :
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व महायुती, फलटण तालुक्याच्या वतीने बुधवारी (दि. २२ जुलै) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. "रक्तदान हेच महादान" या भावनेतून युवकांसह सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी व महायुती, फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून, भाजप फलटण तालुका अध्यक्ष तसेच SIR प्रमुख, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ **श्री अमित मधुकर रणवरे** यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या