राजकीय
जिल्हा बँक निवडणुकीनंतरही राजे गटाची गळती थांबेना! होळमध्ये राजे गटाला आणखी एक धक्का; हनुमंत भोसले यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!
फलटण | वार्तास्त्र प्रतिनिधी
फलटण तालुक्यात नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजे गटातून भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. होळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक हनुमंत भोसले, पैलवान संतोष भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत झालेला हा पक्षप्रवेश राजे गटासाठी आणखी एक राजकीय धक्का मानला जात आहे.
या पक्षप्रवेशावेळी फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादतात्या साळुंखे-पाटील, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे आणि साखरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सुरेश नाना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हनुमंत भोसले, पैलवान संतोष भोसले, पोपट भोसले, कृष्णात भोसले, बाळासाहेब भोसले, रोहिदास शिंदे, रोहित भोसले, सिद्धू भोसले, सोनू शिंदे आणि शुभम शिंदे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
जिल्हा बँकेच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच होळमधील सहकार क्षेत्राशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी राजे गटाची साथ सोडल्याने या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे राजे गटासमोर कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याचे आव्हान निर्माण होत असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ग्रामीण भागातील संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा बँक निवडणुकीनंतरही राजे गटातील अस्वस्थता कायम आहे का, असा प्रश्न या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. सहकार क्षेत्रातील पदाधिकारी भाजपच्या गोटात दाखल झाल्याने आगामी स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे राजे गटाला कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी समतोल राखता येत नाही असे दिसत आहे.
— वार्तास्त्र | फलटण

📷 फोटो गॅलरी
संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,225)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (315)
- पिंपरी-चिंचवडमधील तरुणाने साकारली स्व. अजित पवारांची हुबेहूब प्रतिकृती; गणपती देखाव्यातून आठवणींना दिला भावनिक उजाळा (281)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (279)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (266)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (258)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (233)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (216)