राजकीय
आव्हान स्वीकारण्याची आणि पेलण्याची ताकद असावी लागते!" — रामराजेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत रणजितसिंह नाईक निंबाळकर थेट बंगल्यासमोर दाखल
फलटण (प्रतिनिधी) :
फलटणच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय आव्हानांची चर्चा राज्यभर रंगली आहे. मागील काही महिन्यांपासून फलटणच्या राजकीय पटलावर आजी-माजी नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेला असून, यात आता जाहीर आव्हानांची भर पडली आहे.
काही काळापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला स्वीकारत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गजानन चौक, फलटण येथे ओपन चर्चेसाठी हजर झाले होते; परंतु त्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहिले नव्हते.
या घटनेची पुनरावृत्ती नुकतीच १६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहायला मिळाली. साखरवाडी येथील एका जाहीर कार्यक्रमादरम्यान रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना थेट आव्हान दिले होते की, "पोलिस बंदोबस्त व सिक्युरिटी बाजूला सारून एकटेच समोरासमोर या." यालाच रणजितसिंहांचे जोरदार प्रत्युत्तर आणि 'ते' थेट बंगला मोर्चा
रामराजेंच्या या आव्हानाला अवघ्या काही दिवसांतच जोरदार प्रत्युत्तर देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता कोणत्याही प्रकारचे शासकीय किंवा खासगी सुरक्षा कवच (संरक्षण) न घेता थेट गजानन चौक, फलटण गाठले. विशेष म्हणजे, तेथून पुढे कोणतीही सिक्युरिटी सोबत न ठेवता ते एकटेच थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राहत्या बंगल्यासमोर जाऊन उभा राहिले. परंतु, नेहमीप्रमाणे यावेळेसदेखील रामराजे नाईक निंबाळकर अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,084)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (270)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (182)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)