📅 16 Nov 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
ग्रामीण

पिंपरी-चिंचवडमधील तरुणाने साकारली स्व. अजित पवारांची हुबेहूब प्रतिकृती; गणपती देखाव्यातून आठवणींना दिला भावनिक उजाळा

👤 Kiran Nazirkar    📍 Pune    🗓 16 Sep 2026 10:02 PM    👁 281 Views    ⏱️ 3 मिनिटे वाचन
पिंपरी-चिंचवडमधील तरुणाने साकारली स्व. अजित पवारांची हुबेहूब प्रतिकृती; गणपती देखाव्यातून आठवणींना दिला भावनिक उजाळा
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गणेशोत्सवाच्या काळात राज्यात ठिकठिकाणी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विषयांवर आधारित देखावे साकारले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील तरुण दर्शन सोनवणे याने साकारलेला देखावा अत्यंत चर्चेत आला आहे.
​मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या दर्शनने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाची आठवण जपण्यासाठी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन त्यांची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे.
​देखाव्यातील प्रमुख वैशिष्ट्ये:
​हुबेहूब पुतळा व बाप्पाचे आगमन: स्व. अजित पवार यांच्या हुबेहूब पुतळ्याच्या हातावर श्री गणेशाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
​भावूक संदेश व पोस्टर्स: देखाव्याच्या पार्श्वभूमीत "राजकारण लई वंगाळ आहे...", "मी कामाचाच माणूस आहे", आणि "दादा... पहिल्यांदाच तुमची वेळ चुकली हो..." अशा विविध घोषणांचे व पोस्टर्सचे फलक लावले आहेत.
​विमान अपघाताचा प्रसंग: अजित दादांच्या आयुष्यातील दुर्दैवी विमान अपघाताची प्रतिकृती (मॉडेल) देखाव्यात दाखवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
​'कामाचा माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा भावनिक देखावा


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या