फलटण
फलटण तालुक्यात महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिनीतील फॉल्टमुळे शेतकऱ्याचे नुकसान!
फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील टाकळवाडे परिसरात महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये फॉल्ट झाल्याने शेतातील ऊस जळून तसेच पाइपलाइन व इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती शेतकरीचे वडील अर्जुन नाझीरकर यांनी दिली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रार अर्जानुसार, किरण नाझीरकर हे टाकळवाडे, ता. फलटण जि. सातारा येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीची व कब्जे वहिवाट असलेली शेतजमीन गट क्रमांक १७६/१ मध्ये आहे. या शेतात उसाचे पीकहोते.दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये फॉल्ट झाल्याने शेतात आग लागली. या आगीत उसाचे पीक जळाले असून शेतातील पाइपलाइन व इतर शेती साहित्याचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्याने केली आहे. घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तांत्रिक तपासणी अहवाल प्राप्त करावा, अशी विनंतीही अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. नुकसानभरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे व संबंधित अहवाल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात घटनास्थळाचा पंचनामा, विद्युत वाहिनीतील बिघाडाचे तांत्रिक कारण आणि प्रत्यक्ष नुकसानीची व्याप्ती यांची अधिकृत चौकशी होणे महत्त्वाचे आहे. संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती किंवा पुढील कार्यवाहीची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
टीप : ही बातमी तक्रार अर्जातील माहितीवर आधारित आहे. घटनेचा अधिकृत पंचनामा, तांत्रिक तपासणी अहवाल आणि संबंधित विभागाची बाजू मिळाल्यानंतर आवश्यक ती अद्ययावत माहिती समाविष्ट करता येईल.

📷 फोटो गॅलरी
संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,226)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (315)
- पिंपरी-चिंचवडमधील तरुणाने साकारली स्व. अजित पवारांची हुबेहूब प्रतिकृती; गणपती देखाव्यातून आठवणींना दिला भावनिक उजाळा (281)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (279)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (266)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (258)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (233)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (216)