📅 16 Nov 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
सातारा

सातारा जिल्ह्यातील युवा मंडळांसाठी ‘माय भारत’च्या माध्यमातून नोंदणीची संधी!

👤 किरण नाझीरकर    📍 Satara    🗓 07 Oct 2026 09:54 PM    👁 40 Views    ⏱️ 4 मिनिटे वाचन
सातारा जिल्ह्यातील युवा मंडळांसाठी ‘माय भारत’च्या माध्यमातून नोंदणीची संधी!
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सातारा : केंद्र सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ (MY Bharat – Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील युवा मंडळांना नोंदणीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कार्यरत असलेल्या युवा मंडळांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MY Bharat हे युवकांना स्वयंसेवा, सामाजिक उपक्रम, नेतृत्व विकास, कौशल्यविकास आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या विविध संधींशी जोडण्यासाठी कार्यरत असलेले राष्ट्रीय व्यासपीठ आहे. पूर्वी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर युवा मंडळांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर, MY Bharatच्या माध्यमातून युवकांना डिजिटल स्वरूपात विविध उपक्रमांशी जोडण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

नोंदणीमुळे युवकांना स्वयंसेवा व सामाजिक उपक्रम, नेतृत्व आणि कौशल्यविकास कार्यक्रम तसेच विविध युवा उपक्रमांची माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य, टीमवर्क, नेतृत्व आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या संधींचा लाभ घेता येऊ शकतो.

गावातील युवा मंडळांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, क्रीडा, शिक्षण, रक्तदान आणि सामाजिक जनजागृती यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. MY Bharatशी नोंदणी केल्यामुळे अशा मंडळांना विविध युवा उपक्रमांशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, कोरेगाव, खटाव, माण, वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि खंडाळा या तालुक्यांतील तसेच गावपातळीवरील युवा मंडळांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी MY Bharatचे जिल्हा समन्वयक स्वप्नील देशमुख यांच्याशी 88152 93162 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

— वार्ताहर, सातारा



सर्वाधिक वाचलेल्या बातम्या