ग्रामीण
पिंपोडे बुद्रुकमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडून थेट उत्तरे
पिंपोडे बुद्रुक : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पिंपोडे बुद्रुक येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
महावितरण, पंचायत समिती, कृषी विभाग तसेच इतर विभागांशी संबंधित प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी नागरिकांना माहिती व उत्तरे दिली. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना घरासाठी जमीन खरेदी-विक्री करताना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
या प्रश्नावर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या. तसेच कोरेगाव तालुक्यातील तहसीलदारांनीही नागरिकांना पुढे अशा अडचणी येऊ नयेत, याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले.
गावातील विकासकामे आणि विकास निधीतून होणाऱ्या कामांमध्ये ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अडथळे येऊ नयेत, नागरिकांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचनाही खासदार व आमदारांनी दिल्या.
दरम्यान, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जावरील व्याज परतावा/माफीचा लाभ न मिळाल्याचा प्रश्नही जनता दरबारात मांडण्यात आला. यावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०२४ मधील संबंधित प्रकरणे रद्द झाल्यामुळे लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्यात अशी सुमारे अडीचशे प्रकरणे असून, त्याबाबत फाईल तयार करून पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,084)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (270)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (183)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)