📅 16 Nov 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
ग्रामीण

पीक पंचनाम्यांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे साहेब

👤 किरण नाझीरकर    📍 फलटण सातारा    🗓 29 Sep 2026 07:17 PM    👁 145 Views    ⏱️ 4 मिनिटे वाचन
पीक पंचनाम्यांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे साहेब
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
फलटण | प्रतिनिधी

फलटण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाकडून पीक पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे साहेब यांनी गिरवी व धुमाळवाडी परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी सोनवणे साहेब यांनी संबंधित महसूल कर्मचाऱ्यांना पीक पंचनाम्याचे काम वेळेत व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची व पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेऊन आपल्या शेताचा पंचनामा झाला आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले.

महसूल विभागाकडून पीक पंचनाम्यासाठी संबंधित तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या शेताचा पंचनामा झाला आहे का, याची माहिती घ्यावी. पंचनामा झालेला नसल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन पंचनामा करून घ्यावा.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची वास्तविक परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि पंचनामा प्रक्रियेत महसूल विभागाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे साहेब यांनी केले.

या पाहणीदरम्यान मंडळ अधिकारी स्वाळकर मॅडम, ग्राममहसूल अधिकारी धोतरे, कृषी सहायक जाधव तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पीक पंचनामा प्रक्रियेत संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा पंचनामा वेळेत झाला आहे की नाही, याकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📷 फोटो गॅलरी



संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या