📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र

डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण

👤 Kiran Nazirkar    📍 फलटण    🗓 02 Sep 2026 01:48 PM    👁 99 Views    ⏱️ 2 मिनिटे वाचन
डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्थिव रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांच्या परिवारातील सदस्य आणि नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, पार्थिव रुग्णालयाच्या आत नेण्यावरून वातावरण तापल्याची माहिती समोर येत आहे. परिवारातील सदस्य आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात यावरून वादाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि नेमका वाद कशामुळे निर्माण झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

📍 फलटण | जिल्हा उपरुग्णालय
🔴 पुढील अपडेट लवकरच...


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या