📅 16 Nov 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र

'शिवनेरी' बसचे तिकीट आता थेट व्हॉट्सॲपवर; रांगेत उभे राहण्यापासून प्रवाशांची सुटका!

👤 प्रमोद भिसे    📍 पुणे    🗓 30 Sep 2026 07:04 PM    👁 84 Views    ⏱️ 3 मिनिटे वाचन
'शिवनेरी' बसचे तिकीट आता थेट व्हॉट्सॲपवर; रांगेत उभे राहण्यापासून प्रवाशांची सुटका!
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुणे:
प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पुणे-दादर मार्गावरील शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंग सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही.

अशी आहे व्हॉट्सॲप बुकिंग सुविधा:
व्हॉट्सॲप क्रमांक: ८०१७०३००२२

प्रक्रिया: प्रवाशांना वरील क्रमांकावर फक्त 'Hi' असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर चॅटबॉटच्या माध्यमातून अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून बसल्याजागी हवी ती सीट बुक करता येणार आहे.

भाडे: एस.टी. महामंडळाच्या या लोकप्रिय आणि आरामदायी एसी प्रवासाचे (पुणे-दादर मार्ग) तिकीट ५९० रुपये इतके आहे.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि वेळेची बचत लक्षात घेता MSRTC ने ही डिजिटल सेवा सुरू केली असून, या सुविधेमुळे शिवनेरीचा प्रवास आता आणखीणच सोपा झाला आहे. भविष्यात ही सेवा इतर लोकप्रिय मार्गांवरही विस्तारली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

— प्रमोद भिसे (उपसंपादक/संचालक) वार्तास्त्र न्यूज


संबंधित बातम्या


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या