महाराष्ट्र
पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान विजेचा धक्का; ६ ते ७ जण जखमी
पनवेल : दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाला गालबोट लागणारी घटना पनवेल शहरातील लाईनआळी परिसरात घडली. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमादरम्यान ६ ते ७ जणांना अचानक विजेचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.
उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याचवेळी काही जणांना विजेचा धक्का बसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला, याबाबत अधिकृत माहिती आणि तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, उत्सवादरम्यान पाण्याची फवारणी आणि विद्युत प्रवाहाच्या संपर्कामुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत सुरक्षेचे नियम आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,083)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (269)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (182)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)