📅 15 Sep 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
📰 ताज्या घडामोडी

बारामतीत अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्र सुरू; फिटनेस तपासणी आता अधिक पारदर्शक

बारामती एमआयडीसी परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अत्याधुनिक स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र सुरू झाले असून, व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी कडक आणि पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे.

आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे

आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांसाठी जनता दरबार; नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी पुढाकार

चाकण एमआयडीसीत अवजड वाहनांची कोंडी: स्वतंत्र वाहनतळ व मूलभूत सुविधा पुरवण्याची कामगारांची मागणी

चाकण एमआयडीसी (MIDC) व परिसरात अवजड वाहनांची संख्या वाढल्याने स्वतंत्र वाहनतळाची जोरदार मागणी केली जात आहे. वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या ट्रकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, पार्किंगसह चालकांसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह आणि अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाईची मागणी कामगार व वाहनचालकांनी केली आहे

आव्हान स्वीकारण्याची आणि पेलण्याची ताकद असावी लागते!" — रामराजेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत रणजितसिंह नाईक निंबाळकर थेट बंगल्यासमोर दाखल

लटणच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी आणि राजकीय आव्हानांची चर्चा राज्यभर रंगली आहे. मागील काही महिन्यांपासून फलटणच्या राजकीय पटलावर आजी-माजी नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेला असून, यात आता जाहीर आव्हानांची भर पडली आहे.

सणासुदीच्या तोंडावर खवय्ये आणि सामान्यांना झटका; साखरेच्या दरात तब्बल १९ रुपयांची विक्रमी वाढ!

सणासुदीच्या तोंडावर खवय्यांना मोठा झटका! गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत साखरेचे भाव तब्बल १९ रुपयांनी वाढले असून, 'एस-३०' साखरेचा दर ५८ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे! 📈 एका दृष्टिक्षेपात: १८ जून: ३९ रुपये प्रतिकिलो १९ ऑगस्ट: ५८ रुपये प्रतिकिलो एकूण वाढ: ४८.७% (१९ रुपये वाढ) उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने आगामी काळातही गोडधोडाचा बेत महागण्याची शक्यता आहे.

आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार

फलटणमध्ये आमदार सचिन पाटील यांच्या पुढाकाराने ७ सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस, महसूल, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण, कृषी, वीज, पाणीपुरवठा व विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्या व तक्रारी नागरिकांना थेट लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. प्रश्न/तक्रार अर्ज २५ ऑगस्टपर्यंत आमदारांच्या संपर्क कार्यालयात जमा करावेत.

४७ वर्षांनंतर नर्मदा पाणी वाटप वादाचा शेवट; महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी, वीजहिस्सा आणि पुनर्वसनाला मोठा दिलासा....

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नर्मदा नदी पाणी वाटपाचा तब्बल ४७ वर्षांचा आंतरराज्य वाद निकाली निघाला. या करारामुळे महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी, वीजेतील निश्चित हिस्सा, आदिवासींच्या पुनर्वसनाला गती आणि भविष्यातील सिंचन प्रकल्पांना नवी दिशा मिळणार आहे.

श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह

श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील आज काय मोठा खुलासा करणार? सर्वांचे लक्ष याकडे लागून आहे. फलटण तालुक्यातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या 'श्रीराम सहकारी साखर कारखाना' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील या परिषदेतून थेट जनतेशी आणि सभासदांशी संवाद साधणार आहेत. कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत, उसाच्या प्रश्नांवर आणि कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत या पत्रकार परिषदेत कोणती नवी माहिती समोर येणार? विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर दिले जाणार? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) 'दैनिक स्थैर्य'च्या अधिकृत युट्युब (YouTube) चॅनेलवर पाहायला विसरू नका.

मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा

मुंबई / सातारा:राज्यातील लाखो शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ची पहिली प्रातिनिधिक यादी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर केली आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५५३ पात्र शेतकऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara DCCB) ३८ शेतकऱ्यांचा समावेश आहे .पहिल्या यादीत जाहीर झालेल्या एकूण ५५३ शेतकऱ्यांचे मिळून २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले आहे

मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा

पंढरपूर दौरा आटपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विंचूर्णी (ता. फलटण) येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फार्महाऊसवर भेट देऊन केक कापून वाढदिवस साजरा केला. देशातील अव्वल आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये गणना होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या राजकीय पाठबळाची आणि ताकदीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

← मागील 1 2 3 पुढील →